Vittal Vs Panduranga (Marathi)

Vittal Vs Panduranga (Marathi)

चिंतन#
 
प्रश्न :– विठ्ठल व पांडुरंग एकच आहेत का ? 
 
नसतील तर काय फरक आहे ? 
 
उत्तर :– होय विठ्ठल व पांडुरंग दोन्ही वेगळे आहेत मात्र एकमेकांना पूरक आहेत.कसे ते विस्ताराने पाहू. 
 
या संदर्भात नाथांचा एक अभंग आहे,
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल |
नांदतो केवळ पांडुरंग  || 
 
या अभंगात नाथांनि स्पष्ट सांगितले आहे की आपली काया म्हणजे पंढरपूर आहे आणि या कायारूपी पंढरीत आत्मा हाच विठ्ठल आहे व या पंढरीत नांदणारा पांडुरंग आहे.
 
आता हा विठ्ठल व पांडुरंग कोणते आहेत व कसे आहेत ते पाहु .
 
रुग्वेदातिल पुरूषसूक्ताच्या पहिल्या रुचेत विठ्ठल सांगीतला आहे.
 
ॐ सहस्रशीर्षापुरूषःसहस्राक्ष सहस्रपाद सभूमिंविश्वतोवृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम् |
 
मोरोपंताची एक आर्या आहे ती अशी, 
भू जल तेज समीर ख रवि शशि काष्टादिकी असे भरला |
स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला |
 
म्हणजे याचा अर्थ काय ? तर 
विठ्ठल या शब्दाची फोड अशी आहे 
 
वि:- सभूमिंविश्वतो मधला वि 
ठ्ठ:- अत्यतिष्ठ्ठत मधला ठ्ठ 
ल:- दशांगुलम् मधला ल , असा हा विठ्ठल .
 
थोडक्यात संपूर्ण विश्वाला व्यापून तिष्ठ्ठत म्हणजे उभा असलेला व दशांगुलम् म्हणजे दहा अंगुल्या उरला आहे तो पांडुरंग व विठ्ठल .
 
थोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या देहात असलेला आत्मा म्हणजेच विठ्ठल आहे व या विठ्ठलाला देहात स्थीर व देहाला धरुन ठेवायला साह्य करणारा पांडुरंग म्हणजे आपला प्राण आहे ,
 
यालाच प्राणज्योत म्हणतात.
 
या प्राणज्योतीचा रंग पाडुररंग आहे म्हणजे पांढरा ही नाही आणि पिवळाही नाही असा म्हणजे शुद्ध गायिच्या तुपाचे निरांजन लावले की त्या ज्योतिचा जो प्रकाश पडतो त्याचा रंग पांडुररंग आहे . 
 
आपल्या देहातील प्राणज्योतिचा रंग पांडुररंग आहे म्हणून आत्मा म्हणजे विठ्ठल व प्राण म्हणजे पांडुरंग .
 
*कायाही पंढरी आत्माहा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग* |

Leave a Reply

WordPress Video Lightbox Plugin